Stock to buy today | 50 रुपयांपेक्षाही स्वस्त स्टॉक; छप्परफाड कमाईची संधी
Stock to buy : शेअर बाजार हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही योग्य शेअरमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूक दुप्पट करू शकता.
मुंबई : शेअर बाजार हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही योग्य शेअरमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूक दुप्पट करू शकता. तुमच्या शेअरची निवड चांगली असावी. संबधित कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असायला हवे. चांगला परतावा मिळवण्यासाठी मार्केट एक्स्पर्ट संदिप जैन यांनी कॅश मार्केटमधील एका शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न्स मिळवू शकता.
संदीप जैन यांचा सल्ला
मार्केट एक्स्पर्ट संदीप जैन यांनी आज Pudumjee Paper मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. तुम्ही देखील गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही या शेअरमध्ये पैसे गुंतवू शकता. तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला का दिला आहे.
Pudumjee Paperवर खरेदी सल्ला
संदीप जैन यांनी आज शेअर बाजारात खरेदीसाठी Pudumjee Paperची निवड केली आहे. जैन म्हणाले की, ही कंपनी केवळ पेपरचे प्रोडक्शनच नाही तर स्वच्छतेशी संबंधित उत्पादनेही बनवते. यामध्ये टॉवेल, टिश्यूज सारख्या उत्पादनांचा समावेश आहे.
Pudumjee Paper - Buy
CMP - 39.80
Target - 45/50
Duration - 6-9 महिने
कंपनीचे फंडामेंटल्स
हा शेअर 51 रुपयांच्या उच्चांकीवरून घसरून सध्या 40 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. शेअर स्वस्त असून सध्या कंपनीवर कोणतेही मोठे कर्ज नाही.
कंपनीमध्ये प्रवर्तकांचा 72 टक्के हिस्सा आहे. 2014 मध्ये, कंपनीने आपले विविध व्यवसाय एकाच ठिकाणी विलीन करून काम सुरू केले. हा स्टॉक तुम्ही अल्पावधीत खरेदी करू शकता.