स्वस्त शेअर! 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या शेअरमध्ये करा गुंतवणूक; तुफान कमाईची संधी
शेअर बाजारात पैशाची गुंतवणूक करुन नफा कमवायचा असल्यास योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर बाजारात पैशाची गुंतवणूक करुन नफा कमवायचा असल्यास योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज कॅश मार्केटमधील एका दमदार शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी South Indian Paper वर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावून चांगली कमाई करायची असेल, तर तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता.
South Indian Paper बाबत एक्सपर्टचा सल्ला
संदीप जैन यांनी म्हटले की, कंपनीचे फंडामेंटल्स ठीक आहेत. मागील काही तिमाहींमध्ये कंपनीने चांगले परिणाम घोषित केले आहेत. कंपनी क्राफ्ट पेपर बनवते. ही कंपनी इंपोर्टेड आणि डोमॅस्टिक स्क्रॅप पेपर्सला रिसायकल करून आपला सामान मॅन्युफॅक्चर करते. कंपनी 1959 सालापासून कार्यरत आहे.
Buy Call South Indian Paper
CMP - 173.80
Target - 190
Duration - 6-9 महिने
कंपनीचे वॅल्युएशन आणि परफॉरमन्स
कंपनी खुपच स्वस्त वॅल्युएशनवर ट्रेड करीत आहे. कंपनीने नुकताच आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. आता पॅकेजिंगचे देखील काम कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत गुंतवणूकीसाठी योग्य आहे. येत्या दिवसांमध्ये शेअर्सच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकतो.