Petrol Pump Scams In India: पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च परवडत नाही. अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते. त्यामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. फसवणुकीचे अनेक प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये, भारतीय तेल आणि वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होते की 'पेट्रोल पंप फसवणुकीच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.' त्यामुळे गाडीत इंधन भरताना काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.


काय काळजी घ्याल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पंपावरील व्यक्तीने मागील वाहनात इंधन भरल्यानंतर फिलिंग मशीनचे रीडिंग 0 वर सेट केलं की नाही याची खात्री करा. जर त्याने तसं केलं नसेल तर तुमची फसवणूक होईल.


- वाहनात कमी इंधन भरलं असं वाटत असेल, तर तुम्ही 5-लिटर मात्रा चाचणी करू शकता. सर्व पेट्रोल पंपांना सरकार प्रमाणित 5 लिटर स्केल आहे आणि कोणत्याही पेट्रोल पंपावर 5 लिटर प्रमाण चाचणी घेणे हा तुमचा अधिकार आहे.


- पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना 5 लिटर प्रमाण चाचणीबाबत विचारा. मशिनमध्ये 5 लिटर भरूनही स्केल पूर्ण भरले नाही, तर समजून जा की फसवणूक झाली आहे. जर तुम्हाला कमी इंधन आढळले तर लगेच कळवा.


Sankrit Language: कॅब ड्रायव्हरचा संस्कृतमध्ये संवाद, भाषेवरील प्रभुत्व पाहून तुम्हीही व्हाल आवाक्


या टिप्स फॉलो करा


  • इंधन भरताना नेहमी मीटरवर लक्ष ठेवा.

  • मीटर रीडिंग शून्य आहे की नाही ते तपासा.

  • इंधन भरेपर्यंत मीटरवर लक्ष ठेवा.

  • मीटरसह इंधनाच्या नोजलवरही एकदा नजर मारा.