मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपया कमजोर झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव १-१ रुपयांनी वाढले होते. इंधनाच्या दरांमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली. अनेक शहरांमध्ये डिझेलचे दर आत्तापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. तर पेट्रोलच्या किंमतींमध्येही जलद वाढ होते आहे.


चार शहरांमधले पेट्रोलचे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई- ८५.४७ रुपये लिटर


दिल्ली- ७८.०५ रुपये लिटर


कोलकाता- ८०.९८ रुपये लिटर


चेन्नई- ८१.०९ रुपये लिटर


चार शहरांमधले डिझेलचे भाव


मुंबई- ७३.९० रुपये लिटर


दिल्ली- ६९.६१ रुपये लिटर


कोलकाता- ७२.४६ रुपये लिटर


चेन्नई- ७३.५४ रुपये लिटर


कच्च्या तेलाचे दर वाढले


आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर ५ टक्क्यांनी वाढले आहेत. याचा फटका इंधनाच्या दराला बसला आहे. त्यातच तुर्कस्तानमधल्या आर्थिक संकटामुळे रुपया कमजोर झाला आहे. म्हणून तेल कंपन्यांना कच्च्या तेलाची आयात करताना जास्त खर्च करावा लागतोय.


१५ वर्ष जुनी व्यवस्था बंद


मागच्या जून महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनाच्या दरांमध्ये बदल व्हायचे, पण १५ वर्ष जुनी असलेली ही व्यवस्था बंद करण्यात आली आणि रोज इंधनाचे दर बदलू लागले.