Auto Driver Returns 20 Lakhs : ऑटो ड्रायव्हरने परत केले २० लाखांचे सोन्याचे दागिने
इमानदारी रिक्षा चालकाचं कौतुक
मुंबई : प्रत्येक दिवशी आपल्या कानावर चोरीच्या घटना पडत असतात. अनेकदा लोकं थोड्याशा पैशासाठी लबाडी करताना दिसतात. मात्र तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईतील एका ऑटो ड्रायव्हरने प्रवाशाला चक्क २० लाखांचे दागिने परत केले आहेत. या रिक्षा चालकाच्या इमानदारीचं सगळीकडूनच कौतुक होतंय.
शनिवारी चेन्नईतील बिझनेसमन पॉल ब्राइट ऑटोमध्ये बसले. ते आपल्या मुलीच्या लग्नावरून घरी परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत एक बॅग देखील होती. या बॅगेत २०लाखांचे दागिने होते. प्रवासा दरम्यान ते सतत कुणाशी तरी फोनवर बोलत होते. ज्यानंतर ते रिक्षेतून उतरले आणि पैसे देऊन निघून गेले. या दरम्यान त्यांनी आपली बॅग रिक्षातच विसरले.
त्यानंतर रिक्षा चालक सरवनने रिक्षा पुढे नेली. मात्र थोड्यावेळाने मागच्या सीटवर बॅग राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं. मात्र पॉल यांचा फोन नंबर नसल्यामुळे कोणताच संपर्क होणं अशक्य होतं.
पॉल यांनी दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्यामुळे सगळेच धक्क्यात होते. पॉल यांना ते दागिने मुलीला द्यायचे होते. पॉल यांने हे लक्षात होतं की आपण बॅग रिक्षात विसरलो आहोत. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यामध्ये त्यांना रिक्षाचा क्रमांक मिळाला. यावरून ही रिक्षा सरवनच्या बहिणीच्या नावावर असल्याचं कळलं. पोलिसांनी घडलेला प्रकार सरवनच्या बहिणीला सांगितला. बहिणीने सगळा प्रकार सरवनला सांगितला. आणि सरवन पोलीस घरी पोहोचण्या अगोदरच स्टेशनला जाऊन दागिने परत केले.