Diwali Gift: स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग कंपनी टीम डिटेलिंग सोलूशन्सने दिवाळीच्या आधीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहेत. कंपनीने त्यांच्या निवडक कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 बाइक गिफ्ट केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अधिक प्रोत्साहित करतील, म्हणून कंपनीने हे गिफ्ट दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी केलेली मेहनत आणि त्याग यांची प्रशंसा म्हणून त्यांना हुंदाय, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंजसारख्या विविध कंपन्यांच्या कार भेट म्हणून दिली आहे. कंपनीचे अधिकारी श्रीधर कन्नन यांनी म्हटलं आहे की, कंपनीच्या यशात कर्मचाऱ्यांचाही हा आहे. त्यांच्या प्रयत्नांचे आम्हाला कौतुक आहे. आमचे कर्मचारी हीच आमची संपत्ती आहे.  कंपनीने कर्मचाऱ्यांची कामगिरी, सेवा वर्षांच्या आधारे त्यांचे योगदानाची आम्ही दखल घेतली आहे. आमचे कर्मचारी कंपनीप्रती इमानदार आहेत. त्यांच्या कामगिरीचा आम्हाला आदर वाटतो. कंपनीत सध्या 180 कर्मचारी आहेत असून ते कुशल आहेत. 


आम्ही त्या उमेदवारांची निवड करतो जे कामाप्रती खूप प्रेरित असतात. त्यांच्यासाठी कार किंवा बाईक खरेदी करणे हे स्वप्नासारखे असते. त्या कर्मचाऱ्यांना आम्ही बाईक भेट देतो. 2022 मध्ये आम्ही आमच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना कार भेट दिल्या होत्या. तर, यंदा आम्ही 28 कार गिफ्ट केल्या आहेत. यातील काही मारुती सुझुकी, हुंडाई, मर्सिडिज बेंजयादेखील आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 


कंपनी निश्चित रकमेसह कार किंवा बाईक भेट म्हणून देईल. जर कर्मचाऱ्याला कंपनीने निवडलेल्या वाहनापेक्षा चांगले वाहन हवे असेल तर त्याला उर्वरित रक्कम भरावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. कार गिफ्ट करण्यासोबतच कंपनी कर्मचाऱ्यांना लग्नासाठी मदत म्हणून पैसेही देत आहे. एखाद्या सहकाऱ्याचे लग्न होत असेल तर आम्ही त्यांना लग्नासाठी 50,000 रुपये मदत म्हणून देत होतो. मात्र या वर्षापासून आम्ही ही रक्कम वाढवून 1 लाख इतकी केली आहे.