३१ डिसेंबरनंतर या ६ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत, बंद होणार सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकांचे विलीनीकरण झालेय. एसबीआय व्यतिरिक्त अन्य ५ बँकांमध्ये ज्यांची खाती आहेत ती एसबीआयमध्ये विलीन होणार आहेत.
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहयोगी बँकांचे विलीनीकरण झालेय. एसबीआय व्यतिरिक्त अन्य ५ बँकांमध्ये ज्यांची खाती आहेत ती एसबीआयमध्ये विलीन होणार आहेत.
खरंतर, ३१ डिसेंबर २०१७नंतर स्टेट बँकेशी सहयोगी बँकेसहित ६ बँकांचे चेकबुक अमान्य होणार आहे. याद्वारे कोणताही खातेधारक आपल्या अकाऊंटमधून पैसे काढू शकणार नाही. सुरुवातीला सप्टेंबरमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार होती. मात्र आरबीआयने नुकतीच याची डेडलाईन वाढवली.
एसबीआयच्या माहितीनुसार, ज्या बँकांचे एसबीआयमध्ये विलीनकरण होतेय त्यांना मोबाईल बँकिंग अथवा शाखेत येऊन नव्या चेकबुकसाठी अप्लाय करावे लागेल. यानंतरच खातेधारक चेकद्वारे व्यवहरा करु शकतील
या बँकांचा समावेश
स्टेट बैंक ऑफ बिकानेर अँड जयपूर
स्टेट बैंक ऑफ म्हैसूर
स्टेट बैंक ऑफ त्रावणकोर
स्टेट बैंक ऑफ पटियाला
स्टेट बैंक ऑफ हैदराबाद
भारतीय महिला बँक
विलीनीकरण झाल्यानंतर काय बदल होणार?
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये ६ बँकांचे विलीनीकरण करण्यात आलेय. या विलीनीकरणासोबतच १ एप्रिल २०१७मध्ये या बँकांचे ग्राहक एसबीआयचे ग्राहक असतील. दरम्यान, विलीनीकरणानंतर एसबीआयने आपल्या सुविधा महाग केल्यात. बँकेने सर्व्हिस चार्जमध्येही बदल केलाय. ज्याचा सरळ परिणाम बँक ग्राहकांवर झालाय.
का झाले विलीनीकरण?
एसबीआयच्या सहयोगी बँकांकडून दिले जाणारे क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरुवातीपासूनच एसबीआयच्या नेटवर्कमध्ये काम करत होते. रिपोर्ट्सनुसार, संलग्न बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआय अधिक मजबूत होईल आणि त्याची आर्थिक स्थितीही चांगली होईल. काही दिवसांपूर्वीच एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटलं होतं, विलीनीकरण झाल्यास बँकेकडे ५,००० कोटी रुपयांची निश्चित पूंजी मिळेल. याशिवाय लोनबुकही १७.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल.