छत्तीसगढ : महिलांवरील अत्याचार, वादग्रस्त टीपण्णी विरोधात महिला आयोगाची मदत घेतली जाते. पण छत्तीसगढ (Chattisgarh) महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of the Women's Commission) किरणमयी नायक (Kiranmayi Nayak)  आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकल्या आहेत. त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका होऊ लागलीय. अनेक प्रकरणामध्ये मुली संमतीने संबंध ठेवतात. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर तक्रार करतात असे विधान त्यांनी केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या विधानानंतर किरणमणी नायक यांच्यावर चहुबाजूने टीका झाली. पण त्या आपल्या विधानावर ठाम आहेत. ज्या दिवशी त्यांनी हे विधान केलं त्याच दिवशी एक महिला एका पोलीस कॉंस्टेबरविरोधात तक्रार घेऊन आली होती. त्या पोलिसासोबत ती राहत होती जो आधीच विवाहीत असून त्याला तीन मुलं आहेत. आधीच्या पत्नीसोबत घटस्फोट करुन आपल्यासोबत लग्न करावं असं त्या महिलेला वाटतं होतं. या प्रकरणाशी मिळतीजुळती १८ ते २० केसेस समोर आल्याचे किरणमयी यांनी म्हटलंय. 


मुलींना प्रेम करण्याआधी विचार करायला हवा असे त्या म्हणाल्या.