फटाक्याच्या कारखान्याला आग, आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू
मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या खेरी गावात फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २३ जण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीत १० जण भाजले असून त्यापैकी 8 जणांना नागपूरमध्ये हलवण्यात आलं आहे. तर उरलेल्या दोघांवर बालाघाट जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
भोपाळ : मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या खेरी गावात फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २३ जण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीत १० जण भाजले असून त्यापैकी 8 जणांना नागपूरमध्ये हलवण्यात आलं आहे. तर उरलेल्या दोघांवर बालाघाट जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आगीचं कारण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार कारखान्याच्या परिसरातच कुणीतरी बीडी फुकल्यावर न विझवता फेकल्याने आगीचा भडका उडाला आणि फटाक्याचा कारखाना आगीत भस्म झाला.