रायपूर: छत्तीसगडमध्ये  पुढच्या महिन्यात तब्बल ५० लाख लोकांना स्मार्टफोन वाटप केले जाणार आहे. संचार क्रांती योजने अंतर्गत हे स्मार्टफोन वाटले जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगढ इन्फोटेक प्रमोशन सोसायटी (चिप्स) ने मुख्यमंत्री रमण सिंह यांनी जाहीर केलेल्या संचांर क्रांती योजना (स्काई) च्या माध्यमातून हे स्मार्टफोन वाटण्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली आहे. महिला सशक्तिकरण डोळ्यासमोर ठेऊन ही योजना राबवताना महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.


विद्यार्थ्यांनाही मिळणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या विकास यात्रेदरम्यान लोकांना मोफत स्मार्टफोन देण्याची सुरूवात होईल. त्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील कुटुंबांतील ४० लाख महिला प्रमुखांना आणि शहरी क्षेत्रातील गरिब परिवारांना पाच लाख महिला प्रमुखांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. याशिवाय कॉलेजच्या पाच लाख विद्यार्थ्यांनाही स्मारटफोन देण्याचे उद्दीष्ट आहे.


पहिल्या टप्प्यात वाटणार ३० लाख स्मार्टफोन


अधिकार्यांनी सांगितले की, अशा प्रकारे राबविण्यात येणारी ही देशातील पहिलीच योजना आहे. या योजनेअंतर्गत स्मार्टफोन वाटप करताना दोन टप्पे केले जातील. पहिल्या टप्प्यात ३० लाख लोकांना स्मार्टफोन दिले जातील. उर्वरीत लोकांना त्यानंतरच्या टप्प्यात दिले जातील. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अत्यंत उच्च गुणवत्तेचे स्मार्टफोन खरेदी केले जात असल्याची माहितीही अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. राज्यात ग्रामीण भागात सद्यास्थीतीत मोबाईल फोन कनेक्टिविटी २९ टक्के आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे १३ हजार ९०० गावांना मोबाईल फोनची कनेक्टीव्हीटी चांगल्या दर्जाची मिळणार आहे. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेमुळे गावात ई-गव्हर्नंन्स आणि इतर सेवाई मोठ्या झपाट्याने वाढतील.