पणजी : भागवत सांप्रदायाचा वारसा गोव्यातही तन्मयतेनं जपला जातो. पण इथली पद्धत खास गोमंतकीय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातल्या माशेल इथं आषाढी द्वादशीला वैष्णवांचा मेळा पांडुरंग नामात दंग होत चिखलकाल्यात रंगून जातो. शेकडो वर्षांच्या या परंपरेत हजारो भाविक चिखलकाल्यात नाचतगात कृष्ण क्रिडांचा आनंद लुटतात. श्रीकृष्णाने बालपणी जे खेळ खेळून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तेच सारे खेळ चिखलकाल्याच्या निमित्ताने माशेल येथल्या देवकीकृष्ण मंदिराच्या पटांगणावर खेळले जातात.


यामध्ये बेडूक उड्या, चेंडू फेक, चक्र, आरोप प्रत्यारोप आदिंचा समावेश होता. दहिहंडी फोडून या उत्सवाची सांगता होते. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण भक्तीचा अनोखा संगम या चिखलकाल्यात पाहायला मिळतो.