नवी दिल्ली: कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका चिमुकल्याचा शाळेत जातानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात पण ह्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाळेत जात असताना वडील आणि मुलाने मिळून केलेला व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा शाळेत निघाला आहे. तो घराबाहेर पडणार तेवढ्या मुलाचे वडील त्याच्यावर पैसे ओवाळतात. इतकच नाही तर त्याच्यासाठी ढोल वाजवतात. दीड वर्षांनंतर आपला मुलगा शाळेत जाणार याचा मुलापेक्षा जास्त आनंद वडिलांना झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


2020 मध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे मुलांचं ऑनलाइन शिक्षण सुरू झालं. मुलांना 24 तास घरात कैद केल्यासारखं राहावं लागलं. त्यामुळे मुलंही घरात मोठ्यांना काम करू देईना झाली. त्यामुळे प्रत्येक दिवशी मुलांना काय नवीन करावं असा प्रश्न पालकांसमोर पडला. शाळा सुरू झाल्याने आता या वडिलांना खूप आनंद झाला आहे.



हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन खूपच मजेशीर दिलं आहे. या मुलाचं ढोल नगाऱ्यात शाळेत जाताना वाजत गाजत पोहोचवलं जाणार आहे. विचार करा घरचे किती कंटाळले आहेत. 20 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. वडिलांनी हे सगळं केल्यानंतर मुलाचा खूप मोठा हिरमोड झाला. त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. तर मुलाशेजारी उभ्या असलेल्या आईला मात्र हसू आवरेना झालं होतं.