PUBG मुळे आणखी एक धक्कादायक घटना, मुलाने आपल्याच आईवर झाडल्या गोळ्या
PUBG या गेमचं व्यसन किती भयंकर आहे याचं एक आणखी धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.
PUBG Killed Mother : पबजी गेममुळे आणखी एकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केलीये. या घटनेची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 16 वर्षाच्या या मुलाला आईने गेम खेळण्यापासून रोखल्याने त्याने आईची गोळ्या झाडून हत्या केली. या मुलाला गेम खेळण्याचे व्यसन लागले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तपासादरम्यान 16 वर्षीय मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पूर्व लखनौचे एडीसीपी कासिम अबिदी यांनी मंगळवारी माहिती देताना सांगितले की, "अल्पवयीन मुलाने PUBG गेम खेळण्यापासून रोखल्यानंतर आईवर गोळी झाडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला."
पोलिसांनी सांगितले की, "प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की मुलाला गेम खेळण्याचे व्यसन होते आणि त्याची आई त्याला गेम खेळण्यापासून रोखत असे, त्यामुळे त्याने वडिलांच्या पिस्तुलाने आईची हत्या केली. मुलाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.'
गेल्या काही दिवसांआधी मुंबई देखील PUBG गेम खेळत असताना वैमनस्यातून तीन मित्रांनी ठाण्यातील एका रहिवाशाची चाकूने वार करून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली होती.
ठाणे शहरातील वर्तक नगर येथे राहणारा मृत साहिल जाधव याचा PUBG खेळताना झालेल्या भांडणानंतर त्याचा मित्र प्रणव माळी आणि अन्य दोन तरुणांनी चाकूने वार केले. वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'तीन आरोपींनी साहिलला त्याच्या घराजवळ दारूच्या नशेत पकडले आणि PUBG खेळताना शत्रुत्वानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. तिन्ही आरोपींनी साहिलवर 10 पेक्षा जास्त वार केले होते.