देशात या तीन राज्यांमध्ये अचानक मुलांमध्ये कोरोना संसर्ग, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे कोणती?
देशात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार दिसून येत आहे. देशात तीन राज्यांत मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे दिसून आले आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. आता तर दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात तीन राज्यांत मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे देशात सातत्याने कमी होत आहेत. लोकांसाठी लसीकरण (Vaccine) मोहीम सुरु आहे. परंतु कोरोनाविरुद्ध लढणार्या डॉक्टर आणि आरोग्यसेवा बजावणाऱ्यांसाठी एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. देशामध्ये आता कोरोना संसर्ग हा लहान मुलांमध्ये वाढला आहे.
येथे मुलांवर कोरोनाचे संकट
राजस्थानच्या (Rajasthan) दोन जिल्ह्यात मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. दौसामध्ये (Dausa) 22 दिवसात 300 मुलांना आणि सीकरमध्ये (Sikar) 83 दिवसांत 1757 मुलांना संसर्ग झाला. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील सागर (Sagar जिल्ह्यामध्ये 30 दिवसांत 302 मुलांना संसर्ग झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये 20 दिवसात 2044 मुलांना संसर्ग झाला आहे. ही बहुतेक सर्व सामान्य मुले उपचारानंतर बरे झाली ही विशेष बाब आहे. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे उपचारादरम्यान मुलांच्या मृत्यूची बातमी काही ठिकाणाहून आली आहे.
धक्कादायक आकडेवारी आली समोर
ही बातमी देण्यामागे आमचा आपल्याला घाबरविण्याचा हेतू नाही तर सावधगिरी बाळगणे आहे. जेणेकरुन मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचवता येईल. मुलांमध्ये त्याचा प्रसार होऊ नये म्हणून. परंतु प्रथम आम्ही आपल्याला मुलांमध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या धक्कादायक घटनांबद्दल सांगत आहोत.
राजस्थानच्या दौसामध्ये कोरोनाचा उद्रेक
राजस्थानच्या दौसामधील (Dausa) मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा वेगवान प्रसार धक्कादायक आहे. दौसा जिल्ह्यात मागील 22 दिवसांत 300 मुलांमध्ये कोरोना संसर्ग झाला. परंतु या संक्रमित मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. तथापि, दौसामध्ये एकाही मुलास कोरोना संसग नाही. दौसा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने लोकांना आवाहन केले आहे की, मुलांची विशेष काळजी घ्यावी.
मध्य प्रदेशात सागरमध्ये अनेक मुले संक्रमित
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. सागर जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यात 302 मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली. येथे 4 संक्रमित मुलांचा मृत्यू झाला. सागर जिल्ह्यात बाल कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथील परिस्थिती चिंताजनक आहे.
या सर्वांमध्ये उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. यावर्षी 1 ते 20 मे दरम्यान, उत्तराखंडमध्ये 9 वर्षांखालील 2044 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. या व्यतिरिक्त येथे 8,661 इतके संसर्गग्रस्त आढळले. ज्यांचे वय 10 ते 19 वर्षांदरम्यान आहे.
ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर काळजी घ्या
मुलांमध्ये कोरोना संसर्गाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत ते जाणू घेऊ या.
- जर आपल्या एखाद्या मुलास श्वास घेताना अडचण झाल्याची तक्रार केली तर त्वरीत लक्ष द्या
- मुलांचे नाक वाहते आणि त्याला तीव्र ताप येतो किंवा सौम्य खोकला येतो.
- मुलाला पोटात दुखण्याची तक्रार असेल तर दुर्लक्ष करु नका, त्याला थकवा जाणवू शकतो
- मुलाला अतिसार किंवा उलट्या होत आहेत म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
वरील लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना उपचार कणाऱ्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. त्यांच्याशी बोलून परिस्थिती समजावून सांगा. आवश्यक असल्यास मुलाची तपासणी करुन घ्या. लहान मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे सर्वात महत्वाचे आणि प्रभावी औषध आहे. संपूर्ण जगाला त्रास देणार्या कोरोना विषाणूपासून मुलांना वाचवण्यासाठी विशेष खबरदारी घ्या.