मुंबई : Corona Latest news : देशात कोरोनाचा (Coronavirus ) धोका कमी होत असताना पुन्हा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. भारतात कोविड -19 ची 37,593 नवीन प्रकरणे एका दिवसात समोर आल्यानंतर देशात संक्रमित  (Coronavirus in India) लोकांची संख्या वाढून 3,25,12,366 झाली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. आता लवकरच देशातील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस (Children Vaccine) मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 ते 17 वयोगटातील मुलांचे ऑक्टोबरपासून लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार आहे. गंभीर आजार असलेल्या मुलांना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांना झायडस कॅडिला लस (Zydus Cadila) देण्यात येणार आहे.


दरम्यान, सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले, भारतात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुले आहेत, त्यापैकी एक टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज आहे. 


देशात 18 वर्षांखालील सुमारे 44 कोटी मुले आहेत. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. मुले शाळेत जाऊ शकतात. लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी, असे डॉ. अरोरा म्हणाले. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेची एक ढाल तयार करणेआवश्यक आहे.  त्यामुळे त्यांच्या पालकांनी आणि शाळेय शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे त्वरीत लसीकरण होणे आवश्यक आहे. ते पूर्ण झाले का तेही पाहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.