नवी दिल्ली:  PUBG सह ११८ चिनी एप्लिकेशन्सवर भारताकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चीनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारताचा हा निर्णय चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन करणार आहे. त्यामुळे भारताने ही चूक सुधारावी, असे वक्तव्य चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन तणाव : लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल


यापूर्वी गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ एप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये TikTok, युसी ब्राऊझर, वेबो यासारख्या लोकप्रिय Appsचा समावेश होता. यानंतर लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे बुधवारी केंद्र सरकारकडून PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली. बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये ऍपलॉक, ऍपलॉक लाईट, ड्युअल स्पेस, क्लीनर, एचडी कॅमेरा सेल्फी, म्युझिक प्लेअर, ल्युडो ऑल स्टार प्ले, ब्युटी कॅमेरा प्लस या आणि अशा अणखी बऱ्याच ऍपचा समावेश आहे. 


पंतप्रधानांच्या खासगी वेबसाईटचं ट्विटर हॅक, केली 'ही' मागणी


देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला, एकात्मतेला धोकादायक असल्यामुळे या एप्सवर बंदी घातली जात असल्याचे सरकारने सांगितले. तसेच कारवाईमुळे देशातील मोबाईलधारक आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या हिताचं संरक्षण केलं जाईल, असेही केंद्राचे म्हणणे आहे.