नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_inचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलंय. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीय फंडमध्ये क्रिप्टो करंसीने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी मागणी हॅकरने केली होती.
जॉन विक (hckindia@tutanota.com) या अकाऊंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केलंय. आता हे ट्वीट डिलीट करण्यात आलंय. आम्हाला याबद्दल माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आली होती अशी माहिती ट्वीटरने दिली. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. आणखी कोणती अकाऊंट हॅक झाली का ? याबद्दल अधिक माहिती नसल्याचेही ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
याआधी देखील महत्वाच्या व्यक्तींची अकाऊंट हॅक करण्यात आली होती. अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन, माजी अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अरबोपती व्यावसायिक टायकून एलोल मस्क यांचे अकाऊंट हॅक झाले होते.
उबेर आणि एप्पलच्या कॉर्पोरेट खात्यांमध्येही छेडछाडीचा प्रयत्न झाला. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसचे अकाऊंट दोन वेळा हॅक झाले. त्यानंतर त्याने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला.