मुंबई : चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि.  १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही प्रयोगशाळा पृथ्वीकडे झेपावताना रविवार १ एप्रिल रोजी पहाटे १ वाजल्यापासून सायं. ७ वाजेपर्यंत कधीही चार मिनिटे भारतावरून जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा भाग येत असून ती अडीच मिनिटांत महाराष्ट्रावरून जाईल. या प्रवासात ती भारतातही कोसळण्याची शक्यता आहे. अर्थात अवकाशात वरच्यावर तिचे तुकडे होतील त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे श्री. सोमण यांनी सांगितले.


यापूर्वी सन १९७९   मध्ये स्कायलॅब अशीच कोसळली होती. त्यावेळी तिचे तुकडे महासागरात कोसळली होते. रविवारी या स्पेस स्टेशनने पृथ्वीच्या वायूकक्षेत प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यानंतर खगोलतज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे. एका स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती आहे. या स्पेस स्टेशनची एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन(सीएनएसए) ने मे २०१७ मध्येच २०१६ पासून स्पेस स्टेशनसोबतचा संपर्क तुटल्याचं सांगितलं होतं. हे चिनचं पहिलं स्पेस स्टेशन होतं. २०११ मध्ये हे लॉन्च केलं होतं, त्यावेळी स्वर्गातील राजमहल असं त्याला नाव देण्यात आलं होतं.