नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील डोकलाम वादाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही चीनी सैनिकांनी भारतीय सीमा भागात 2 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली आहे. सिक्कीममध्ये जवळपास दोन किलोमीटरपर्यंत चीनी सैनिक भारतीय भागात आले होते. यानंतर भारतीय जवानांनी मानवी साखळी बनवून त्यांना रोखलं. सूत्रांच्या माहितीनुसार सर्व चीनी सैनिकांना त्यांच्या भागात परत पाठवलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान सिक्किममध्ये नाकू या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. इंटेलिजेंस ब्यूरोच्या एका अधिकाऱ्यांच्या मते जवळपास 50 चीनी सैनिकांनी भारतीय भागात घुसखोरीचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार तास चीनी सैनिक तेथेच उभे राहिले. आपल्या भागात जाण्य़ास ते नकार देत होते. दोन्ही बाजुने कोणीही गोळी नाही चालवली. पण अधिकाऱ्याच्या मते चीन आणि भारतीय सैनिकांमधील आमना-सामना यामुळे वाद वाढू शकतो. पण भारतीय जवानांनी त्यांना त्यांच्या भागात जाण्यास भाग पाडलं.


एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 4 तास चीनी सैनिकांना अडवल्यानंतर ही ते आपल्या भागात जाण्यास तयार नव्हते. 100 भारतीय जवानांनी मानवी साखळी बनवून त्यांना रोखलं. बॅनर ड्रिलनंतर दोन्ही बाजुची स्थिती नियंत्रणात आणली गेली. दोनों देशांच्या 3,488 किलोमीटर लांब सीमा भागात ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली नाही. दोन्ही देशांमध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात नेहमी वाद होतात.