तुम्हीही लावताय का ही लिपस्टिक शेड..शेड निवडा तुमच्या स्किन टोन नुसार
यामुळे तुमचा लूक एकदम बोल्ड आणि सुंदर होईल.
LIPSTICK SHADE: सुंदर दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर मेकअप करतो त्यात फाऊंडेशन,नेलपेंट,मस्कारा या सर्व गोष्टी आपण वापरतो यात सर्वात महत्वाची असते ती लिपस्टिक प्रत्येकीकडे कोणत्याना कोणत्या रंगाची लिपस्टिक ही असतेच चेहऱ्याला आकर्षक बनवण्याचं महत्वाचं काम करते लिपस्टिक मात्र बऱ्याचदा चुकीचा लिपस्टिक शेड निवडला तर आपला लुक फार विचित्र दिसू शकतो.यासाठी आपल्या स्किन टन नुसार लिप्स्टिकची निवड कारण महत्वाचं असत.बऱ्याचदा इतरांच्या ओठांवर एखादी शेड चांगली दिसते म्हणून आपण शेड खरेदी करतो मात्र आपल्या ओठांवर टी सूट होत नाही यासाठी स्किनटोन नुसार लिपस्टिक शेड निवडणं खूप गरजेचं असत
जाणून घेऊया अशाच काही लिपस्टिक शेड्स विषयी
वाइन रंग
मेकअप लुकमध्ये वाइन कलरचा समावेश करा. यामुळे तुमचा लूक एकदम बोल्ड आणि सुंदर होईल. त्याच वेळी, हे रंग वार्म स्किन टोनला तसेच लाइट टोनला अनुकूल आहेत. जर तुम्हाला चेहरा ताजा आणि तरुण दिसायचा असेल तर तुम्ही वाइन कलर लावून पहा
जिंजरब्रेड कलर
जर तुम्हाला ब्राउन रंग आवडत असेल मात्र तुमच्यावर तो रंग जात नाहीये तर तुमच्या मेकअप किटमध्ये हा रंग नक्की ऍड करा या शेडमध्ये ऑरेंज शेड मिक्स असते जी तुमच्या स्किन टोन वर सहज उठून दिसते स्किन लाइट असो किंवा गडद असो, या रंगाचे कॉम्बिनेशन सर्वांनाच छान दिसतो
या रंगाचे कॉम्बिनेशन सर्वांनाच छान दिसते कॉलेज किंवा ऑफिसमध्ये हा र रंग छान दिसतो.
ब्राइड रेड या रूबी रेड
जर तुम्हाला बोल्ड कलर निवडायचा असेल तर रुबी रेड कलर निवडा. हा रंग जवळजवळ प्रत्येक त्वचेच्या टोनशी देखील जुळतो. जर तुम्हाला डार्क मरून किंवा वाइन शेडची लिपस्टिक आवडत नसेल तर हा रंग नक्की आवडेल कारण या रंगात जांभळ्या रंगाची शेड मिक्स केलेली असते म्हणून वेगळी शेड दिसते
डस्की पिंक कलर
गुलाबी लिपस्टिकची ही शेड प्रत्येक स्किन टोनला मॅच करते कॅज्युअल ते पार्टी लुक कुठेही हि शेड तुम्ही लावू शकता .यामुळे चेहरा पूर्णपणे फ्रेश दिसतो आणि चॅन लुक सुद्धा येतो..