मिशेलला भारतात आणणं सरकार आणि सीबीआयचं मोठं यश
पहिल्यांदाच ब्रिटिश नागरिकाला दुबईच्या मार्गे भारतात आणलं
नवी दिल्ली : सीबीआयचे माजी डायरेक्टर ए.पी.सिंह यांनी क्रिश्चियन मिशेलला भारतात आणल्याने हे सरकार आणि सीबीआयचं मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. याआधी देखील अनेकांना दुबईतून भारतात आणलं गेलं आहे पण पहिल्यांदाच एका ब्रिटिश नागरिकाला दुबईच्या मार्गे भारतात आणलं गेलं आहे.
भारताचे दुबईसोबत चांगले संबंध आहेत. जेव्हा कोणत्याही नागरिकाला भारतात आणण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हबा मानवअधिकारचा मुद्दा पुढे करत ते भारताची मागणी फेटाळून लावत. पण यावेळी मात्र अगस्ता वेस्टलँड प्रकरणात मिशेलला भारतात आणणं हे सरकारचं मोठं यश आहे.
माजी डायरेक्टर ए.पी सिंह यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, 'सरकार आणि राजकारण यांच्यामध्ये काय संबंध असतात याबाबत ते कोणतंही वक्तव्य करणार नाहीत. पण याआधी सीबीआयने डिफेंस डीलसंबंधित प्रकरणाची चौकशी केली आहे. यामध्ये मोठे दलाल असल्याचं समोर आलं आहे. मिशेलच्या प्रकरणात सीबीआयला तर याचं क्रेडिट मिळेलच पण सरकारचं देखील यात मोठं यश आहे. कारण 2 सरकारमध्ये ही डील झाली.
दुबई आणि ब्रिटेन येथून कोणालाही ताब्यात घेणं यात खूप अंतर आहे. भारताला अजूनही ब्रिटेनमधून कोणतंही यश हाती आलेलं नाही. आतापर्यंत भारतीय नागरिक दुबईमधून भारतात आणले गेले आहेत पण पहिल्यांदाच ब्रिटीश नागरिकाला भारतात आणलं आहे. नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकार कशा प्रकारे इतर देशांच्या सरकारवर दबाव आणतं हे देखील महत्त्वाचं असतं.