एअरपोर्टवर पतीला सीऑफ करायला आलेल्या महिलेवर गुन्हा दाखल
आपल्या पतीला आणि मुलांना एअरपोर्टवर बाय करण्यासाठी एक महिला गेली, पण तिला गुन्हेगार ठरवण्यात आलं.
नवी दिल्ली : आपल्या पतीला आणि मुलांना एअरपोर्टवर बाय करण्यासाठी एक महिला गेली, पण ती गुन्हेगार ठरली. हे प्रकरण दिल्लीतलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या टर्मिनल थ्रीचं असलं तरी गंभीर आहे. ही मूळची ब्रिटीश महिला आपल्या पती आणि मुलांसोबत एअऱपोर्ट टर्मिनल सिक्युरिटी होल्ड भागात येऊन आपल्या परिवाराला सीऑफ करू इच्छीत होती. याच इच्छेपोटी तिने बेकायदेशीर पाऊल उचललं. या महिलेचे मनसुबे पाहून तिला सीआयएसएफने आयजीआय एअरपोर्टच्या ताब्यात दिलं. आयजीआय एअरपोर्ट पोलिसांनी या महिलेविरोधात आयपीसी कलम ४१७ आणि ४४७ नुसार एफआयआर दाखल केली आणि तिला अटक करण्यात आली.
टर्मिनलमध्ये अशी दाखल झाली ही महिला
या महिलेची चौकशी करण्यात आली, तिचं नाव फ्रान्सेस हेलेन थॉमस असल्याचं तिने सांगितलं. अधिक चौकशीनंतर तिने सांगितलं, आपले पती आणि २ मुलांसह ब्रिटीश एअरवेजच्या फ्लाईटनंबर BA-256 ने लंडनला जात होते. ही फ्लाईट दिल्ली एअरपोर्टहून सकाळी १०.२३ ला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टसाठी रवाना झाली. सीआयएसएफनुसार ही महिला आपल्या पती आणि मुलांसह टर्मिनलच्या चेक-इन एरियात सीऑफ करू इच्छीत होती. यासाठी या महिलेने पती आणि मुलांसह तिकीट बूक केलं, एकाच फ्लाईटचं हे तिकीट होतं, तिकीट बुक केल्यानंतर त्या तिकीटाची प्रिंट घेतली. प्रिंट आऊट घेतल्यानंतर तिकीट रद्द केलं. यानंतर कॅन्सल केलेल्या तिकीटावर ती टर्मिनलच्या चेक-इन एरियात आली.
टर्मिनलच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात फसली
चौकशीनंतर लक्षात आलं की ही महिला आपल्या पती आणि मुलांसह सकाळी सव्वा सातला टर्मिनलमध्ये आली होती. आपला पती आणि मुलांना सीऑफ केल्यानंतर, तिने पाहिलं की, टर्मिनलमधून बाहेर जाणाऱ्या लोकांचे दस्तऐवज अधिकारी तपासत आहेत. आपण आता पकडले जाऊ, या भीतीने ती टर्मिनलमध्ये बराच वेळ फिरत राहिली. सकाळी १०.३० वाजता, सीआयएसएफच्या इंटेलीजन्स विंग अधिकाऱ्याची नजर तिच्यावर पडली. या महिलेच्या तिकिटाची पडताळणी करण्यात आल्यावर, सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना लक्षात आलं की, या महिलेचं तिकीट बऱ्याच आधी रद्द करण्यात आलं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना फसवून ही महिला एअरपोर्टच्या आत दाखल झाली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर सीआयएसएफने या महिलेला दिल्ली एअरपोर्ट पोलिसांच्या ताब्यात दिलं.