VIRAL: कांदा - लसणाची चव सलग 45 वर्षे तरी चाखली नाही कारण... `या` गावातील आजी-आजोबा सांगतायत एक रहस्य
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही.
Viral News: अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये कधी कोणती परंपरा सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अशाच एका गावाची अशीच एक निराळी गोष्ट आहे. येथे 45 वर्षांपासून लोकांनी लसणाची चवही (Onion and Garlic) घेतलेली नाही. परंतु हे नक्की कोणतं गाव आहे जिथे लोकांनी कित्येक वर्ष झाली तरी लसणाची चव (Garlic and Onlion Taste) घेतलेली नाही, ही परंपरा येथे का आली आणि कुठून सुरू झाली असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. लसणाचे महत्त्व आपल्याकडे खूप आहे. आपल्या जेवणातही आपण लसणाचा चांगला वापर करून घेतो. फोडणीसाठी तर आपल्याला लसूण हे लागतच लागतं. परंतु या गावात मात्र लसूण खाणं वर्जच आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की हे गाव कोणतं आणि येथे कांदा - लसूण बंदी केव्हा पासून आली. (citizens of triloki bigha village near jehanabad bihar didnt consume onion and garlic since 45 years know the reason)
हे गाव बिहारमध्ये आहे. त्रिलोकी बिगहा (Triloki Bagha) गाव या नावानं हे गाव ओळखलं जाते. जहानाबाद या गावाच्या जिल्हा मुख्यालयाच्या 30 किलोमीटर जवळ हे गाव आहे. हे गाव चिरी पंचायतच्या अंतर्गत येते. या गावात फार फार तर 30 किंवा 35 घर आहेत परंतु येथे कांदा - लसूण खाणं अक्षरक्ष: बंद आहे. तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की नक्की या ठिकाणी इतकी कमी लोकसंख्या असूनही लोकं लसूण का बरं खात नाहीत.
या गावात राहणाऱ्या वयस्कर मंडळी असं म्हणतात की गेली 40-45 वर्षे तरी त्यांनी येथे कांदा - लसूणाची चव चाखली नाही. याचं कारण आहे की, येथे एक ठाकूरवाडी परिसरापाशी एक मंदिर आहे. या मंदिरामुळे आम्ही येथे कांदा लसूण खात नाही.
काय आहे कारणं?
येथे कोणी कांदा, लसूण, मांस किंवा दारूचे सेवन केले तर येथील लोकांच्या आयुष्यात अनेक वाईट घटना घडू लागल्या होत्या. अनेकांनी या परंपरेला तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना मात्र त्याच्या बदल्यात मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे लोकं येथे कांदा - लसूण खात नाहीत. त्याशिवाय येथे कोणी मांस किंवा दारूचेही (Alcohol) सेवन करत नाही. येथे कुठल्याही बाजारात तुम्हाला हे पदार्थ पाहायालाही मिळणार नाहीत. या पदार्थांशिवाय तुम्हाला बाकीचे सगळेच पदार्थ मिळतील परंतु हे प्रमुख पदार्थ मिळणार नाहीत अशी या गावाची गोष्ट आहे. तुम्हीही या गावाला भेट द्याल?