नवी दिल्ली :  जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत.  काही दिवसांपूर्वीच घरगूती गॅस महागल्याचे वृत्त असताना आता त्यात 'तांदळाने खडा टाकला' आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील तांदळाचे उत्पादन घटल्याने तांदळाच्या किंमतीतही वाढ होणार असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे आता खायचे काय असाच प्रश्न गृहिणींना पडला आहे. 
 महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये  २०२०पर्यंत तांदूळ उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही घट ५ टक्के एवढी असणार आहे. तर हरियाणा आणि पंजाबसह उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये तांदळाच्या उत्पादनामध्ये ६ ते ८ टक्के घट होणार आहे. 
 बिहारचे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हुकुमदेव नारायण यादव यांच्या नेतृत्त्वाखालील ३१ सदस्यांच्या समितीने याविषयीचा अभ्यास केला होता. त्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 


 
 दूध उत्पादनातही घट


वातावरण बदलामुळे दुधाच्या उत्पादनामध्येही घट होऊ शकते. लोकसभेमध्ये संसदेच्या कृषीविषयक स्टँडींग कमिटीने सादर केलेल्या अहवालात या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.



बटाटा उत्पादनात वाढ


 तांदूळ उत्पादनात घट होत असली तरी बटाटा उत्पादनात मात्र वाढ होण्याची चिन्हे आहेत. २०३० पर्यंत हरियाणा, पंजाब, पश्चिम आणि मध्य उत्तरप्रदेशमध्ये बटाट्याच्या उत्पादनात ३.४६ टक्के ते ७.११ टक्के वाढ होणार असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. 
 तर देशामध्ये बटाट्याचे उत्पादन १६ टक्क्यांवरून ४ टक्क्यांपर्यंत घसरेल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


  
 ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम


 अन्न धान्याच्या उत्पदनात घट होण्यास जगभरात वाढलेले ग्लोबल वार्मिंग कारणीभूत आहे. याचाच परिणाम अन्नधान्यावर पडलेला दिसून येतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल होत आहे, त्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये अन्न-धान्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.