बंगळुरु : कर्नाटकमध्ये झालेल्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जेडीएसने विधानसभेच्या दोन्ही तर लोकसभेच्या मंड्या आणि बेल्लारी या जागेवर विजय मिळवला आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी या निवडणुकीत इतिहास रचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा: कुमारस्वामींपेक्षा पत्नी राधिकाकडे तीन पट अधिक संपत्ती


 


पहिल्यांदा कोणता मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह विधानसभेत प्रवेश करणार आहे. या विजयानंतर अनिता कुमारस्वामी या मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी एकत्र विधानसभेत दिसणार आहेत. कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी याआधी पहिल्या सदनच्या सदस्य होत्या. कुमारस्वामी रामानगर येथून आमदार होते तेव्हा अनिता या मधुगिरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होत्या. पण मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अनिता यांच्यासाठी हा पहिला योग असणार आहे.


अधिक वाचा: कुमारस्वामींचं ज्यावर्षी झालं पहिलं लग्न, त्यावर्षी दुसऱ्या पत्नीचा झाला जन्म


रामानगर विधानसभेच्या जागेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात होती. त्यांचा हा विजय निश्चित मानला जात होता. अनिता कुमारस्वामी यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मोठी आघाडी घेतली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार एल चंद्रशेखर यांचा 1,09,137 मतांना पराभव केला.


अधिक वाचा: ही आहे जेडीएस नेते कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी!