राफेल कथित ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रतिक्रिया
काँग्रेसच्या आरोपावर मनोहर पर्रिकरांची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : राफेल विमान खरदी प्रकरणावर काँग्रेस नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा सतत प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी गोवाचे आरोग्य मंत्री विश्वजीत प्रतापसिंह राणे यांची एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे. ज्यामध्ये असा दावा करणात आला आहे की, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये राफेल डील संबंधित सगळ्य़ा फाईल आहेत. यावर 'माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना राफेलबाबतचे रहस्य उघडावे असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
पर्रिकरांची प्रतिक्रिया
मनोहर पर्रिकर यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, काँग्रेसने जारी केलेली ऑडियो क्लिप राफेलवर काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात असत्य प्रकाशात आल्यानंतरही सत्याला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. कॅबिनेट किंवा इतर कोणत्याही बैठकीत अशी चर्चा झालेली नाही.'
विश्वजीत राणे यांनी या संबंधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. 'त्यांनी म्हटलं की, हा एक डॉक्टरेड ऑडियो आहे. या विषयावर माझी कोणासोबतची काहीही चर्चा झालेली नाही.'