मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.


मोदी-शहांना शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी फोन करुन पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुकीआधी नीतीशकुमार यांनी गुजरातमध्ये भाजपचं सरकार येईल असं म्हटलं होतं. गुजरातमध्ये फक्त मोदीच मोदींना हरवू शकतात असं त्यांनी म्हटलं होतं.


१९ राज्यांमध्ये भाजप


गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपने विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली आहे. या विजयाबरोबर देशभरात १९ राज्यांमध्ये आता भाजप आणि युतीचं सरकार आहे.


विरोधक झाला मित्र


एकेकाळी मोदींचे कट्टर विरोधक मानले जाणारे नीतीश कुमार यांनी भाजपचा हात पकडला. लालू यादव यांच्या सोबत असलेली आघाडी नीतीशकुमार यांनी तोडली. भाजपसोबत गेल्याने मोदींचा आणखी एक विरोधक कमी झाला. नीतीश कुमार यांना विरोधकांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानपदासाठी देखील प्रमोट केलं होतं. पण नीतीश कुमारचं आता मोदींच्या सोबत गेल्याने मोदींना याचा चांगला फायदा झाला आहे.