पुढील आठवड्यात योगी आदित्यनाथ आग्रा भेटीला
उत्तर प्रदेशचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच छेद दिला.
गोरखपूर : उत्तर प्रदेशचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच छेद दिला.
भारतमातेच्या सुपुत्रांच्या घाम आणि रक्ताने ताजमहालची निर्मिती झालीय, त्यामुळे त्याचं रक्षण करणं ही उत्तर प्रदेश सरकारची जबाबदारी आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री य़ोगी आदित्यनाथ यांनी केलं.
पुढील आठवड्यात आदित्यनाथ आग्राला भेट देऊन पर्यटनविषयक योजनांचा आढावा घेणार आहेत. कोणत्याही बादशहाने बांधला असलं तरी ताजमहाल एक ऐतिहासिक वास्तू आहे त्यामुळे त्याचं महत्त्व जपायलाच हवं असं आदित्यनाथ म्हणाले.