नवी दिल्ली : 'एखाद्या मुख्यमंत्र्यानं नोएडाला भेट दिली तर त्याची खुर्ची त्याला लवकरच सोडावी लागते' असं हसत हसत म्हटलं जातं... परंतु, सद्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा समज खोटा ठरवलाय. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी पाचव्यांदा नोएडाला भेट दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसपा आणि सपाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांसाठी नोएडाला येणं 'अशुभ' असल्याच्या वावड्या उठत होत्या... त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी नोएडाला भेट देणं टाळलंही... परंतु, योगींनी मात्र या अफवांना भिक घातली नाही. २३ डिसेंबर २०१७ रोजी ते पहिल्यांदा नोएडाला दाखल झाले होते... त्यानंतर दोन दिवसांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधानांनी मेट्रोचं उद्घाटन केलं तेव्हाही योगी आदित्यनाथ तिथं उपस्थित होते. 


त्यानंतर ८ जुलै रोजी त्यांनी सिंचन विभागाच्या कामाच्या समिक्षेसाठी नोएडा गाठलं... आणि ९ जुलै रोजी पाचव्यांदा ते सॅमसंग कंपनीच्या उद्घाटनालाही दाखल झाले. 


उल्लेखनीय म्हणजे केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजप सरकार स्थानापन्न झाल्यानंतर नोएडाला पंतप्रधान मोदींनी चार वेळा भेट दिलीय तर मुख्यमंत्री योगींनी पाच वेळा... उत्तरप्रदेशाच्या इतिहासात मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी या प्रदेशाचा दौरा इतक्या वेळा झाल्याचं पहिल्यांदाच घडतं.