लखनऊ : भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांची वाय श्रेणीची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. उन्नाव प्रकरणात आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची वाय श्रेणीची सुरक्षा मागे घेतली आहे. यात एक एचसीपी आणि तीन पोलीस शिपाई याचा समावेश होता. त्यांची तैनात त्यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती. आमदारांची सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पोलीस लाइन काउंटर इन्स्पेक्टर गोरखनाथ सिंग यांनी सांगितले, आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा सरकारच्या आदेशावरून काढण्यात आली आहे.


 समाजवादी पार्टी सरकारने पुरवली होती सुरक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप सिंग सेंगर यांना समाजवादी पार्टी सरकारच्या काळात वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यात एक एचसीपी आणि तीन पोलीस शिपाई तैनात करण्यात आले होते . कुलदीपसिंग सेंगर भाजपमध्ये सामील झाल्यानंतर समाजवादी पक्ष त्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याची शक्यता होती. परंतु उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली नव्हती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि सीबीआय चौकशीमुळे सरकारकडून पुरविण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी सरकारने त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेत.


शशि सिंग यांला जेलमध्ये पाठविले


उन्नाव प्रकरणातील आरोपी शशि सिंग याला जेलमध्ये पाठिवण्यात आले आहे. सीबीआयने कोठडी संपल्यानंतर शशिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. शशि सिंग यांच्या पुढील चौकशीसाठी पुन्हा सीबीआय पुन्हा न्यायालयात पुन्हा एक सीबीआय कोठडी देण्याची मागणी करु शकते. तसा अर्ज करण्याची शक्यता आहे. 


पीडित कुटुंबातील चौकशी


 उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआय प्रत्येक दिवसाची चौकशी करीत आहे आणि या प्रकरणाची चौकशी करत आहे. गुरुवारी (१९ एप्रिल) सकाळी पीडित आणि तिच्या कुटुंबीयांना लखनऊला नेण्यात आले. आवश्यक ती चौकशी झाल्यानंतर सीबीआयने पुन्हा त्यांना उन्नावला आणले. पीडित तरुणीच्या काकाने सांगितले की, कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घेऊन चौकशी करण्यात आले.