कोंबडा आरवल्यामुळे (cock bang) आजही अनेकांची पहाट होते. मात्र हे चित्र गावाकडेच दिसते, शहरात अशा घटना क्वचितच घडतात. मात्र याच घटनेला अनुसरूण आता एक घटना समोर आली आहे. या घटनेत शेजारचा कोंबडा आरवतो म्हणून एका डॉक्टरने (Doctor) पोलिसात तक्रार (Police Complaint) केली आहे. डॉक्टरची ही तक्रार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. या घटनेची चर्चा आता संपुर्ण राज्यभर पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंबडा आरवतो (cock bang) यात काही नवीन नाही. हा कोंबड्यातला गुणच आहे. या कोंबड्याच्या आरवण्याने अनेकांची सुखद सकाळ होत असल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र प्रथमच कोंबड्याच्या आरवण्याने एखाद्याची दुखद सकाळ होत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोंबड्याच्या आरवण्यामुळे झोपमोड होत असल्याने एका डॉक्टरने (Doctor) पोलिसात शेजाऱ्याविरोधात तक्रार (Police Complaint) दाखल केली आहे. ही तक्रार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. 


पोलिसात तक्रार


इंदोरच्या पलासिया पोलिस स्टेशन हद्दीतील ग्रेटर कैलाश हॉस्पिटलजवळ राहणारे डॉक्टर आलोक मोदी यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार (Police Complaint) दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, घराजवळ एक महिला कोंबडी आणि कुत्री पाळते आहे. महिलेचा कोंबडा रोज पहाटे ५ वाजता आरवतो, त्यामुळे त्यांना याचा त्रास होतो, असे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर (Doctor) नेहमी रात्री उशिरा घरी परततात. त्यामुळे अनेकदा डॉक्टर झोप पूर्ण करण्यासाठी झोपायला जातात तेव्हा कोंबडा आरवतो, यामुळे त्यांची झोप मोड होते. त्यामुळे कोंबड्याच्या आरवण्याने त्रस्त झालेल्या डॉक्टराने (Police Complaint) व्यथित होऊन त्यांनी कोंबडीच्या मालकिणीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


पोलिसांचे म्हणणे काय?


दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल (Police Complaint) करून तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आधी दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यानंतरही हे प्रकरण न मिटल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे.


ही घटना इंदोरमध्ये (Indore News) घडली आहे. या घटनेची संपुर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे.