मुंबई : उत्तर भारतात बऱ्याच राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये काही दिवसांपासून पाऊस पडत होता. पण रविवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. रविवारी हवामान वातावरण चांगलं होतं. पण थंडीची लाट कायम होती. त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे की, सोमवारपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमधील विविध भागात शीतलहर पुन्हा येणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांत या भागातील किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी तामिळनाडू आणि केरळमधील वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दोन्ही राज्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस उत्तर भारतातील बर्‍याच भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये धुके पडण्याची शक्यता आहे.


उत्तर प्रदेशचे हवामान पुन्हा बदलले आहे. शनिवारी रिमझिम पावसानंतर रविवारी तापमान वाढले. उत्तर प्रदेश हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सकाळी स्वच्छ आकाश असल्यामुळे सूर्याचा प्रकाश वाढला आणि पारा ही वाढला. उत्तर भारतातील डोंगराळ भागात जोरदार हिमवृष्टी होत आहे. यामुळे शीतलहर सुरू झाली आहे.


रविवारी सहा ते 13 कि.मी.च्या वेगाने सुरू असलेल्या कोल्ड वेव्हमुळे इटावामध्ये किमान तापमानात घट झाली.