नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चिनी सैन्याशी दोन हात करताना भारताचे तीन जवान शहीद झाले होते. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये तेलंगणाच्या कर्नल संतोष बाबू यांचा समावेश आहे. शहीद कर्नल संतोष बाबू हे १६व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. गेल्या दीड वर्षापासून ते भारत-चीन सीमारेषेवर तैनात होते.कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. 
तर अन्य दोन जवानांपैकी एकजण तामिळनाडूचा होता. पलनी (वय ४०) असे या जवानाचे नाव होते. पलनी हे तामिळनाडूचे सुपूत्र होते. त्यांच्या भावाने या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. मात्र, अजूनही तिसऱ्या जवानाची ओळख समोर आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने; जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडले?




दरम्यान, या घटनेमुळे भारत-चीन सीमारेषेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. काहीवेळापूर्वीच चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाईम्स'ने भारतीय सैन्याने पुन्हा चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा कांगावा केला. People's Liberation Army (PLA)च्या हवाल्याने ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिले आहे.सोमवारी रात्री झालेल्या झटापटीत चीनचेही पाच सैनिक मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तर ११ सैनिक जखमी झाले आहेत. मात्र, चीनकडून यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.