नवी दिल्ली : IndiavsChina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारतीय जवान शहिद झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. त्यामागोमागच आता या प्रकरणात चीनचा कमांडिग ऑफिसर मारला गेल्याची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत सुत्रांचा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन आणि भारतामध्ये ही झडप ज्या ठिकाणी झाली त्या भागांमध्ये चीनच्या सैन्याच्या हॅलिकॉ़प्टर्सच्या वाढलेल्या फेऱ्या पाहून शेजारी राष्ट्राचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्ट होत आहे. दोन्ही सैन्यांमध्ये झालेली हिंसक झडप पाहता यामध्ये चीनच्या सैन्यातील अनेक जवान जखमी झाले. ज्यांना त्या भागात तयार करण्या आलेल्या वाटेनं स्ट्रेचर, रुग्णवाहिकांच्या सहाय्यानं आणि हॅलिक़ॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्याच आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या रात्री उशिरा गलवान खोऱ्यात ही घटना घडली होती. ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांचं नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर, चीनच्या सैन्यातील मारल्या गेलेल्यांची संख्या ही जास्त असल्याचंही म्हटलं जात आहे. पण, अधिकृत आकडा मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. 


शहीद कर्नल संतोष बाबूंच्या आईला 'या' गोष्टीचं जास्त दु:खं


 


दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सुरु असणारं तणावाचं वातावरण टोकाला पोहोचलेलं असतानाच इथं नवी दिल्लीत हालचालींना बराच वेग आला आहे. सर्वपक्षीय बैठकांपासून ते सैन्यप्रमुख आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांच्या बैठकींची सलग सत्र सुरु आहेत. तेव्हा या मुद्द्यावर नेमका कसा तोडगा काढला जाणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.