मुंबई : कोरोना व्हायरसमुळं देशभरात बहुतांश भागांमध्ये ल़ॉकडाऊऩची घोषणा केलेली असतानाच याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर झाल्याचं पाहायला मिळालं. वाहनसेवांपासून इतरही अनेक सेवा ठप्प असल्यामुळं आता पुढं काय, असा प्रश्नही अनेकांसमोर उभा राहिला. विद्यार्थ्यी वर्गाला या काळात सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागला. पण, एका राज्यातील प्रशासनानं मात्र विद्यार्थ्यांची अनोख्या मार्गानं जबाबदारी घेत एक नवा पायंडाच पाडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात सध्या कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणाऱ्या केरळ राज्याची आणखी एका कारणामुळं चर्चा सुरु आहे. कारण, कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही बारावी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीसाठी Kerala State Water Transport Department (SWTD) या विभागातर्फे  कुट्टनाड पासून निघून ते कोट्टायम येथे स्थित शाळेत पोहोचवण्यासाठी म्हणून पूर्णच्या पूर्ण ७० आसनी बोट सेवा पुरवण्यात आली. 


कोट्टायम स्थित एसएनडीपी उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सँड्रा बाबू  हिला तिच्या परीक्षेला पोहोचवून तेथून परतीच्या प्रवासासाठीही दोन दिवसांसाठी प्रशासनाकडून ही सेवा पुरवण्यात आली. 


Kerala State Water Transport Department (SWTD)चे संचालक आणि विभागीय मंत्री शाजी व्ही. नायर यांच्या सहकार्यपूर्ण कृपेमुळं मला माझ्या शैक्षणिक वर्षातील या टप्प्यात मोठी मदत झाली, असं खुद्द सँड्रा म्हणत असल्याचं वृत्त 'द न्यू इंडियन एक्प्रेस'कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 


 


सँड्राच्या पालकांनी काही समाजसेवकांच्या साथीनं Kerala State Water Transport Department (SWTD)शी संपर्क साधत तिचा हा प्रवास अधिक सोपा केला, ज्याबाबत तिनं आभारही व्यक्त केले. 
देशभरामध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण असणाऱ्या केरळ राज्यात शिक्षणासाठी प्रशासनासह स्थानिकांची ओढ, तगमग आणि अर्थातच अडचणीच्या वेळी इतरांच्या सहकार्यासाठी धावून येणारे समाजसेवक हे खरंच साऱ्या देशापुढं एक आदर्श प्रस्थापित करत आहेत.