Commerce ministry on chinese medicine : भारताने गेल्या काही महिन्यांपासून चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी कोंडी करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने चीनी मोबाईल कंपन्यांविरोधात धडक कारवाई केली.भारतात नफा कमवून तो गैरमार्गाने चीनमध्ये (China) पाठवल्याबद्दल ईडीने चिनी स्मार्टफोन ब्रँड विवोवर (Vivo) काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता देशांतर्गत औषध कंपन्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी, केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने विविध प्रकारच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या चिनी बनावटीच्या ऑफ्लोक्सासिन (Ofloxacin) या अँटीबायोटिक औषधावर पाच वर्षांसाठी अँटी डंपिंग ड्युटी (Anti-dumping duty) लागू केली आहे. 


डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजला (DGTR) त्यांच्या तपासणीत आढळले की चीनमधून हे औषध कमी किंमतीत भारतात पाठवले जाते होते. ज्यामुळे देशांतर्गत उद्योगावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. 


दरम्यान,डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने म्हटले की, प्राधिकरणाने या उत्पादनावर 5 वर्षांच्या कालावधीसाठी अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे.


भारतातील आरती ड्रग्स लिमिटेडने चीनकडून कमी किमतीत औषध पाठवले जात असल्याची तक्रार केली होती. तसेच याबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर डीजीटीआरने या प्रकरणी मोहीम राबवून सविस्तर तपास केला.