LPG Cylinder Price: चांगली बातमी ! LPG सिलिंडरची किंमत घटली, इतक्या रुपयांना मिळणार !
LPG Cylinder Price Reduced: सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी भेट दिली आहे. LPG सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत घटल्याने व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले.
LPG Cylinder Rate In Marathi : गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरमध्ये 350 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता या महिन्यापासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले. यातून लोकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी, तुम्ही पूर्वी जेवढे पैसे मोजत होता तेवढेच पैसे द्यावे लागतील. अर्थात 1100 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
आज 1 एप्रिलपासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत 2028 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत दिल्लीत 2119.50 रुपये, कोलकात्यात 2221.50 रुपये आणि मुंबईत 2071.50 रुपये होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, व्यावसायिकांना दिलासा देताना स्वयंपाकाच्या सिलिंडरबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार, देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,103 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये 1,129 रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1102.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1118.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
घरगुती सिलिंडरची किंमत | |
शहर | दर |
दिल्ली | 1103 |
कोलकाता | 1129 |
मुंबई | 1102.50 |
चेन्नई | 1118.50 |
श्रीनगर | 1219 |
पाटणा | 1201 |
आयझॉल (मिझोराम) | 1255 |
अहमदाबाद | 1110 |
भोपाळ | 1118.50 |
जयपूर | 1116.50 |
रांची | 1160.50 |
बंगळ | 1115.50 |