Commercial LPG Cylinder Price Petrol Diesel Prices: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच इंधनाच्या दरांबरोबरच गॅस सिलेंडरचे दरही कमी झाले आहेत. 19 किलोग्राम वजनाच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. एका अर्थाने उद्योग, व्यापारामध्ये असलेल्या सिडेंलर वापरकर्त्यांना नवीन वर्षाचं अनोख सप्राइज देताना पहिल्याच दिवशी कंपन्यांनी प्रति सिलेंडर 1.50 रुपये दरकपात केली आहे. नवीन किंमत ही आज सकाळपासून म्हणजेच पहाटे 6 वाजल्यापासून लागू झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने गृहिणींना या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे.


सर्वसामान्यांना फायदा नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्यांच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना कोणताीही थेट फायदा मिळणार नाही. घरातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र कमर्शिअल म्हणजेच हॉटेल व्यवसाय, आस्थापने आणि इतर ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरात ही लवलत लागू होणार आहे.


विमानप्रवास स्वस्त


ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हवाई इंधनाच्या दरांमध्ये कपात केली आहे. या इंधनाचे दर 4162.50 रुपये प्रति किलो लीटरपर्यंत कमी करण्यात आले आहेत. सलग तिसऱ्यांदा हवाई इंधनाचे दर कमी करण्यात आल्याने प्रवाशांना याचा फायदा पोहचवण्याच्या दृष्टीने विमानप्रवासाच्या तिकीटांचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजपासून इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.


अंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर स्थिर


अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत आज कमी झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता डब्ल्यूटीआय क्रूड प्राइजमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. प्रति बॅरल किंमत 71.65 डॉलर इतकी होती. तर ब्रेंट क्रूड 77.04 डॉलर प्रति बॅरलला विकलं जात होतं. देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर नव्याने जाहीर केले जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी दर जाहीर केले जायचे. 


महाराष्ट्रात इंधन स्वस्त


आज बिहारमध्ये पेट्रोल 36 पैशांनी महाग झालं असून डिझेलचे दर 34 पैशांनी महागले आहेत. गुजरातमध्येही पेट्रोल आणि डीझेलचे दर प्रति लीटर 27 पैशांनी वाढले आहेत. याशिवाय हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही इंधनाचे दर वाढले आहेत. तर दुसरीकडे पंजाबमध्ये पेट्रोल 28 पैशांनी तर डीझेल 27 पैशांनी कमी झालं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 34 पैशांनी तर डीझेल 31 पैशांनी स्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलची किंमत 37 पैशांनी आणि डीझेल 36 पैशांनी कमी झालं आहे. उत्तराखंड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही इंधनाचे दर घसरले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचे दर 94.27 रुपये लीटर इतके आहेत.