नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. भारताने आतापर्यंत ५०३ पदक जिंकली आहेत. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय. काल राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीत दोन सेट जिंकून फुलराणी सायनाची सुवर्णकमाई केली तर पी.व्ही. सिंधू आणि श्रीकांतला रौप्यवर समाधान मानावं लागले. नेमबाज तेजस्विनी सावंत हिने दोन पदकांची कमाई केली. अव्वल नेमबाज असलेल्या हिना सिद्धूनं राष्ट्रकूल स्पर्धेत गोल्ड मेडलला गवसणी घातलीय. राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारची सुरुवात दोन पदकांनी झालीय. एकाच वेळी भारताने दोन पदकांची कमाई केलीय. बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे जेतेपद पटकावत सायना नेहवालने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ गेम्स) स्पर्धेचा विचार केला तर भारताने आतापर्यंत ५०३ पदक जिंकली आहेत. तसेच स्वातंत्रपूर्वीची गोष्ट केली तर भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या ५०५ वर जाते. भारताने प्रथमच चांगली कामगिरी केलेय. राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारची सुरुवात दोन पदकांनी झालीय. एकाच वेळी भारताने दोन पदकांची कमाई केलीय. बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे जेतेपद पटकावत सायना नेहवालने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय.


भारताचे कॉमनवेल्थमधील आतापर्यंत चांगले प्रदर्शन


वर्ष       ठिकाण        सुवर्ण   रौप्य   कांस्य     एकूण
2010   दिल्ली          38       27       36       101
2002   मॅनचेस्टर      30       22       17        69
2018   गोल्ड कोस्ट   26       20       20        66
2014   ग्लास्गो        15       30       19         64



अंतिम सामन्यात फुलराणी सायनानं भारताच्याच पी.व्ही. सिंधूचा पराभव केलाय. सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात सायनाने सिंधूचा 21-18, 23-21 असा पराभव केला. या विजयामुळे सायनाने सुवर्णपदक तर सिंधूने रौप्यपदक पटकावलंय. करियरमध्ये दुस-यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची किमया सायनाने साधलीय. 



राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलंय. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या श्रीकांतचा मलेशियाच्या ली चाँग वुईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. चाँग वुईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला. श्रीकांतने पहिला गेम 21-19 अशा फरकारने जिंकून सुवर्णपदाकाकडे वाटचाल केली होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये लीनं दमदार पुनरागमन केलंय. ली चाँग वुईने दुसरा गेम 14-21 असा मोठ्या फरकाने जिंकत श्रीकांतवर आघाडी मिळवली. दुस-या गेममध्ये आघाडी घेतल्यानंतर चाँग वुईने तिसरा गेम सहज जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.



भारताची अव्वल नेमबाज असलेल्या हिना सिद्धूनं राष्ट्रकूल स्पर्धेत गोल्ड मेडलला गवसणी घातलीय. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक पटकावल्यानंतर तिनं २५मीटर पिस्तुल प्रकारात सवर्णपदक पटकावलय. मूळची पंजाबची असलेली हिना ही महाराष्ट्राची सून आहे. मराठमोळ्या तेजस्विनी सावंतनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं सुवर्णवेध साधला. या सुवर्णपदकासह तेजस्विनीनं भारताचा तिरंगा गोल्डकोस्टमध्ये डौलनं फडकावला. 



कुस्तीपटू राहुल आवारेनं ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानं ५७ किलो फ्रि-स्टाईल कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. त्याच्या या सुवर्ण कमाईमुळे बीडमधील पाटोद्यात जल्लोषाचं वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदकाची कमाई करुन देणारी आणि भारताची अव्वल बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमनं राष्ट्रकूल स्पर्धेत गोल्डन पंच लगावलाय. विशेष म्हणजे मेरी कोम ही सध्या राज्यसभेवर खासदार आहे. यामुळे तिच्या या कामगिरीचं अधिकच कौतुक करावं लागेल.