Yathindra Siddaramaiah Statement : कर्नाटकात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तसेच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यावरुन आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करु असे यतिंद्र सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. माझ्या वडिलांनी राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री व्हावे, असे यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान झाले. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात चुरशीची लढत झाली, मात्र सत्तेची चावी कोणाकडे आहे, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने 121 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 78 आणि जेडीएस 22 जागांवर आणि अपक्ष 3 जागांवर आघाडीवर आहेत.


दरम्यान,  कर्नाटकमध्ये भाजप पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजपचे 8 कॅबिनेट मंत्री पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. भाजपला हा मोठा धक्का असल्याचं म्हंटलं जात आहे. कल सातत्याने बदलताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसत आहे. बेळगावातही काँग्रेसच आघाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना पक्ष कार्यालयात येण्यास सांगितले आहे



राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आणि जेडीचे (एस) एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप राज्यातील सत्ता परिवर्तनाची 38 वर्षे जुनी परंपरा खंडित करु इच्छित आहे. त्यासाठी पक्ष मोदी इफेक्टवर अवलंबून आहे. मात्र, येथे काँग्रेसची जादू दिसून येत आहे. 


त्याचवेळी, काँग्रेसला ही निवडणूक जिंकायची आहे. तशी काँग्रेसची आघाडी दिसून येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी या निवडणुकीचा काँग्रेसला वापर करता येईल. त्याचवेळी, निकालानंतर स्पष्ट स्थिती दिसून येईल.