बेघर लोकांबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता
बेघर लोकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बेघर लोक राहतात. त्यांना निवारा मिळत नाही ही चिंतेची बाब आहे.
नवी दिल्ली : बेघर लोकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बेघर लोक राहतात. त्यांना निवारा मिळत नाही ही चिंतेची बाब आहे.
आधार कार्ड नाही, सोयी-सुविधा नाही
बेघर लोकांकडे आधार कार्ड नाही, त्यांना कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. ते भारताचे नागरिक नाहीत का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं यावेळी विचारला. देशभरात गावातून मोठ्या शहरात स्थलांतरीत होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
रस्त्यांचा आधार निवारा
अशा स्थलांतरींना नाईलाजाने रस्त्यांचा आधार निवाऱ्यासाठी घ्यावा लागतो. त्यातच सध्याच्या कडाक्याच्या थंडीत अशा रस्त्यांवर राहणाऱ्या बेघरांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.