Dead Bodies in Garbage Truck: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात (Accident) झाला. तीन बसेसच्या या भीषण अपघातात एकूण 12 लोकांनी आपला जीव गमावला, तर 39 लोक जखमी झाले. अपघातानंतर जखमींना रीवा आणि सिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातानंतर काँग्रेसने (Congress) एक व्हिडीओ ट्वीट करत शिवराज सिंग चौहान सरकारला (Shivraj Singh Chauhan Government) लक्ष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने ट्वीट केलेल्या व्हिडीओत काही लोक एका ट्रॉलीत मृतदेह ठेवत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून काँग्रेसने शिवराज सिंग चौहान सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या आदिवसींचे मृतदेह कचऱ्याच्या गाडीत भरले जात आहेत असा आरोप काँग्रेसने या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. 


दरम्यान काँग्रेसने आणखी एक ट्वीट केलं असून, अमित शाह यांच्या रॅलीत जीव गमावणाऱ्या आदिवासींच्या अंत्यसंस्कारासाठी शिवराज सिंग चौहान यांचं सरकार साधं लाकडांची व्यवस्थाही करु शकलं नाही असं म्हटलं आहे. शिवराज आदिवसींचा इतका द्वेष का करतात? आदिवासींवर वार, हेच शिवराज सरकार अशी टीका काँग्रेसने केली आहे. 



अपघात नेमका कसा झाला?


मध्य प्रदेशातील सतना येथे आयोजित कोल महाकुंभ कार्यक्रमातून या तीन बसेस परतत होत्या. अमित शाह या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. बस रस्त्याच्या कडेला उभ्या असतानाच वेगाने आलेल्या एका बसने त्यांना धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, बस खाली दरीत जाऊन कोसळली. यावेळी अनेकजण बसच्या खाली आल्याने दबले गेले. रात्री 9 वाजता हा अपघात झाला. 


बचावानंतर 33 लोकांना रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान पाचजणांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. अपघातातील मृतांची संख्या 12 झाली आहे.