नवी दिल्ली  : देशात स्वातंत्र्य दिनापासूनच चौफेर 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'ची चर्चा आहे. यासंदर्भातील सरकारी आयोजनातील फोटोमध्ये देशातचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो नसल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.कॉग्रेस नेत्यांनी भारतीय इतिहास अनुसंधान परिषदे संकेतस्थळावरील 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'च्या फोटोतून पंडित नेहरूंचा फोटो नसल्याने तीव्र आक्षेप घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांची टीका
कॉग्रेसच्या नेत्यांनी ICHRच्या वेबसाईटवरील 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'शी संबधीत फोटोचा स्क्रिनशॉट ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये महत्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, भगत सिंह, मदनमोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे फोटो आहेत. परंतु नेहरूंचा फोटो नाही. 


तसेच राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की,  'देशाचे लाडके पंडित नेहरू' यांना हृदयातून कसे काढता येईल. या पोस्टमध्ये त्यांनी नेहरुंच्या जीवनावर आधारीत फोटो शेअर केले. 


कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
लोकसभेत कॉंग्रेसचे उप नेता गौरव गोगाई यांनी म्हटले आहे की, कोणताही देश स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंतप्रधानांचा फोटो नाही हटवणार परंतु येथे केले गेले. हे 'तिरस्कारी' आणि 'अन्यायपूर्ण' आहे. ICHR ने नेहरूंचा फोटो हटवून स्वतःला कलंकित केले आहे. असे कॉंग्रेसनेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.


माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील ICHRच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे.