नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta banerjee) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपच्या (BJP) विरोधात देशाला मजबूत पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस (Congress) गप्प बसली असेल तर आपणही गप्प बसायचे का? (Congress answer to Cm mamta banerjee)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UPA च्या अस्तिवावर ही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी म्हटले आहे की, काँग्रेसशिवाय भाजपला पराभूत करू शकतो हा कोणत्याही पक्षाचा विचार हे केवळ स्वप्न आहे. यासोबतच त्यांनी भारतीय राजकारणातील सत्य सर्वांना माहीत असल्याचेही म्हटले आहे.



ममता बॅनर्जी यांचा राहुल गांधींवर निशाणा


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांनी शरद पवारांना भाजपविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्य की, 'कोणी काही करणार नाही आणि परदेशात राहिले तर कसे चालेल?'


ममता बॅनर्जी यांना काँग्रेससोबत का लढत आहे, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे आमच्याविरुद्ध लढू शकतात, तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. मी तळागाळातून आले आहे. जिवंत असेपर्यंत लढत राहिल.'


काय म्हणाले शरद पवार?


शरद पवार म्हणाले की, बंगाल आणि महाराष्ट्र यांचे जुने नाते आहे. ममता बॅनर्जी सर्व समविचारी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या विरोधात पर्यायी काम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो."


त्याचवेळी काँग्रेसच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, 'काँग्रेसला बाजूला ठेवून कोणताही पर्याय देण्याचा प्रयत्न नाही. सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल. जो कोणी सोबत येईल, त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ.'