नवी दिल्ली : Rahul Gandhi Detained: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. (Sonia Gandhi's inquiry from ED) याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. देशभरात काँग्रेसची आंदोलने सुरु आहेत. रस्त्यावर ठाण मांडणारे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आज अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) दिल्ली कार्यालयात हजर झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी - वाड्रा होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रपती भवनाकडे खासदारांच्या मोर्चादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी विजय चौकात ताब्यात घेतले. संसदेपासून विजय चौकापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात काँग्रेस नेते देशव्यापी निदर्शने करत आहेत. 


सोनिया गांधी यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. आज पुन्हा दुसऱ्यांदा ईडीकडून सोनिया गांधी यांची चौकशी होणार असल्याने काँग्रेसकडून देशभरात शांततेत सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सर्व खासदार, प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीसांना आंदोलनात सहभागी होण्याचे हायकमांडचे आदेश आहेत. सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी सुरु आहे आहे. त्याविरोधात देशभरात काँग्रेस निदर्शने करत आहे. मात्र ही निदर्शनं शांततेत सत्याग्रहाच्या पद्धतीने करा, असे आदेश हायकमांडने दिले आहेत. 


यावेळी काँग्रेसकडून भाजप सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणांचा कथित दुरुपयोग केल्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांनी प्रतिनिधी सभागृहापासून राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेसने मोर्चा काढला. इतर राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले आणि निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. 


गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी, केंद्रीय तपास संस्थेने सोनिया गांधी यांना नवीन समन्स पाठवले आणि विनंती केली की त्यांनी सोमवारपर्यंत नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीत हजर व्हावे. नंतर ते समन्स एक दिवस पुढे ढकलण्यात आले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राजकीय सूडबुद्धीत गुंतले आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.