नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी मतदानानंतर केलेल्या रोड शोवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय. मोदींनी घेतलेला रोड हा निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय निवडणूक आयोग मोदींच्या दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी दिल्लीत केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींनी साबरमतीच्या बुथ नंबर ११५ मध्ये मतदान केल्यानंतर स्वतःच्या गाडीतून जनतेला हात दाखवत अभिवादन केलं. हा एकप्रकराचा प्रचारच असल्याचा काँग्रेसाचा आरोप आहे.