PM Modi Live : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) बोलताना पीएम नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी बनवली, पण ही इंडिया (I.N.D.I.A) आघाडी नाही तर घमंडिया आघाडी असल्याचा टोला पीएम मोदी यांनी लगावला. यांच्या वराततीत सर्वांनाच नवरदेव बनायचं आहे, प्रत्येकाला पंतप्रधान बनयाचं आहे अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. नाव बदलून देशावर राज्य करेल असे काँग्रेसला वाटतं. त्यांच्या नावावर रुग्णालयं आहेत. पण तिथं उपचार होत नाहीत. विमानतळावर त्यांचं नाव, पुरस्कार. स्वतःच्या नावावर,  अनेक योजना स्वत:च्या नावावर सुरु केल्या आणि मग त्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. जनतेला काम पहायचे आहे पण त्यांना मिळालं फक्त एका घराण्याचं नाव, अशी टीका पीएम मोदी यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या नावाशी संबंधित काहीही त्यांच्या मालकीचं नाही. निवडणूक चिन्हापासून विचारापर्यंत सर्व काही दुसऱ्यांकडून उसनं घेतल्याचं पीएम मोदी यांनी सांगितलं. पक्षाचे संस्थापक ए ओ ह्यूम हे परदेशी होते. 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी ऊर्जा आणि ध्वज मिळाला. देशातील जनतेने तो स्विकारला. त्या झेंड्याची ताकद पाहून काँग्रेसने रातोरात ते चिन्ह चोरलं. तिरंगा ध्वज पाहून लोकांना वाटेल की तो जनतेचा आवाज आहे. इतकंच काय तर गांधी नावही चोरलं आहे असा हल्लाबोल पीएम मोदींनी केला.


हे ही वाचा :  पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'


राहुल गांधी यांच्यावर टीका
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. लंका हनुमानाने जाळली नाही, ती रावणाच्या गर्वाने जाळली. जनता देखील रामाचे रूप आहे, म्हणूनच काँग्रेसचे  400 वरून 40 खासदार झाले असा निशाणा मोदींनी विरोधकांवर साधला. काँग्रेस नेत्यांच्या वाढदिवसाला विमानात केक कापले जातात. पण त्यातच विमानात गरीबांसाठी वॅक्सिन नेलं जातं. एक काळ असा होता की ड्रायक्लीनिंगचे कपडे विमानाने आणले जायचे. आज चप्पल घातलेला गरीब माणूस विमानाने प्रवास करतो. काँग्रेसच्या काळात मौज मस्ती, सुट्टी घालवण्यासाठी नौसेनेची जहाजं मागवली जायची. पण आता याच जहाजातून दूर देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणलं जातं. 


हे ही वाचा :  PM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा


 


ग्रेस गेली अनेक वर्ष एकच अयशस्वी प्रोजेक्ट लाँच करत आहे. पण प्रत्येकवेळी तो फेल होतोय, परिणामी जनतेविरोधात त्यांच्या मनात रोष आहे, असा टोला पीएम मोदी यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता लगावला. ती लोकं प्रेमाच्या दुकानाचा प्रचार करतात. पण प्रत्यक्षात ते लूटमारीचे दुकान आहेत. त्यांच्यात द्वेष, घोटाळे आणि तुष्टीकरण आहे. या दुकानात आणीबाणी, फाळणी, शीखांवरचे अत्याचार आहेत असा घणाघातही मोदी यांनी केला.