PM Modi Speech in Parliament LIVE: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दुपारी 4 वाजता संसदेत अविश्वास प्रस्ताव आणि मणिपूरवरील विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. अविश्वास प्रस्ताव हा आमच्याविरोधात नाही तर ही विरोधकांचीच कसोटी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना (Oppositions) केवळ राजकारण करायचं आहे. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
विरोधकांवर निशाणा
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना टोला लगावला. विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) नीट चर्चा केली नाही. विरोधकांनी फिल्डिंग लावली, सरकारने चौकार-षटकार मारले पण अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो-बॉल-नो-बॉल करत राहिले. सरकारकडून शतके रचली जात होती. त्यामुळे मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, जरा मेहनत घेऊन येत या. तुम्हाला 2018 मध्ये सांगितलं होतं की जरा जास्त मेहनत करुन या, पण पाच वर्षातही काहीही बदलले नाही असा टोला पीएम मोदी यांनी विरोधकांना लगावला. देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देशातील जनतेचे आभार. देव खूप दयाळू आहे असे म्हणतात. देवाने विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. 2018 मध्येही विरोधकांनी तसा प्रस्ताव आणला हा देवाचा आदेश होता. अविश्वास ठराव ही आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, तर ती विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ आहे असंही मोदी यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षांसाठी पक्ष देशापेक्षा मोठा आहे. तुम्हाला गरिबांची भूक दिसत नाही, तर सत्तेची भूक तुमच्या मनावर आहे. तुम्हाला तुमच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, देशातील तरुणांच्या भवितव्याची नाही असा घणाघात पीए मोदी यांनी केलाय.
'गुडचा गोबर केला'
1999 मध्ये वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार विरोधकांचं नेतृत्व करत होते. त्यांनी भाषणााला सुरू केला. 2003 मध्ये अटलजींचे सरकार होते. तेव्हा सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी अविश्वास ठराव मांडला. 2018 मध्ये खरगे विरोधी पक्षनेते होते, यावेळी प्रस्ताव त्यांनी मांडला. पण यावेळी अधीर बाबूचे (रंजन) काय झाले. त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अमित भाई यांनी सांगितल्यानंतर त्यांना संधी देण्यात आली. पण गुड का गोबर करण्यात ते माहिर असल्याचा टोला पीएम मोदी यांनी लगावला.
हे ही वाचा : अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
रोधकांना सत्तेची भूक
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. अशी अनेक विधेयके होती जी गावे, गरीब, दलित, मागास, आदिवासी, त्यांच्या कल्याणासाठी आणि भविष्यासाठी होती. पण विरोधकांना त्याची फिकीर नाही. त्यांच्यासाठी देशापेक्षा पक्ष मोठा आहे. देशापुढे पक्षाला प्राधान्य दिले जाते, हे विरोधकांच्या आचार-विचारावरून सिद्ध झाले आहे. विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक लागली आहे, हे मला समजते.