`शहरात नवीन माफीवीर आलाय`; कोर्टाची माफी मागितल्यानंतर विवेक अग्निहोत्रींवर कॉंग्रेस नेत्याची टीका
Delhi HC : द्वेषपूर्ण चिंटूने कोर्टात माफी मागितली पण ट्वीट डिलीट केल्याचं कोर्टात खोटं बोलल्याचंही समोर आले, असेही कॉंग्रेस नेत्याने म्हटलं आहे
Vivek Ggnihotri : द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक विविके अग्नीहोत्री सध्या ट्रोल होत आहेत. विवेक अग्नीहोत्री यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहत माफी मागण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) दिले होते. न्यायमूर्ती एस. मुरलीधर (S. Muralidhar) यांच्यावर टीका केल्याने न्यायालयाने अग्निहोत्री यांना फटकारले होते. गौतम नवलखा यांना मिळालेल्या जामीनानंतर विवेक अग्निहोत्री यांनी या निर्णयावरुन भाष्य करताना न्यायाधिशांवर टीका केली होती. मात्र न्यायालयाने फटकारल्यानंतर अग्निहोत्री यांनी लेखी माफी मागितली आहे.
विवेक अग्नीहोत्री यांनी माफी मागितल्या नंतर कॉंग्रेसकडून त्यांना ट्रोल करण्यात करण्यात येत आहे. कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत अग्नीहोत्री यांना नवे माफीवीर असे म्हटले आहे.
"शहरात एक नवीन माफीवीर आला आहे. द्वेषपूर्ण चिंटूने कोर्टात माफी मागितली पण ट्वीट डिलीट केल्याचं कोर्टात खोटं बोलल्याचंही समोर आले. ते ट्विट खरेतर ट्विटरने डिलीट केलं होतं. आता एक 'माफी फाइल्स'ही बनवला पाहिजे," असं सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र सुप्रिया श्रीनेत यांनीही या ट्विटमध्ये एक चूक केली आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिल्ली हायकोर्टाच्या जागी सुप्रीक कोर्ट असे म्हटले आहे.
काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?
न्यायमूर्ती एस. मुरलीधर पक्षपाती असल्याचा आरोप अग्नीहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलखा यांना दिलासा मिळाल्यामुळे अग्निहोत्री यांनी हे वक्तव्य केले होते. या प्रकरणी अग्निहोत्री यांनी लेखी माफी मागत आपलं वक्तव्य मागे घेतले. मात्र न्यायालयाने अग्निहोत्री यांना या प्रकरणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.