नवी दिल्ली : राजकिय वर्तुळातून दु:खद बातमी समोर येत आहे. कॉग्रेस नेत्याच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कॉग्रेसच्या नेत्यावर शोककळा पसरली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात काँग्रेस नेत्याच्या मुलीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तानिया काकडे (25) असे या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे या अपघातात कारमध्ये उपस्थित 2 जण सुरक्षित आहेत. पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाबाद हा रंगा रेड्डी जिल्ह्यातील राजेंद्रनगर विभागाचा एक विभाग आहे. येथे काँग्रेस नेते फिरोज खान यांची मुलगी तानिया काकडे (25) ही शमशाबाद विमानतळ रोडवरून आपल्या I-20 कारने जात होती. या दरम्यान तिची कार दुभाजकाला धडकून पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत तिचा अपघाती मृत्यू झाला. कारमध्ये आणखी दोन जण होते, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.


शमशाबादच्या एसीपीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास एक I-20 कार शमशाबाद रस्त्यावरील दुभाजकावर आदळली आणि उलटली. या अपघातात तानिया नावाच्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तिला तातडीने उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.  सध्या या प्रकऱणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.